A must read for everybody. It's one of the best books I've ever read. I was just going through the book yesterday. I would like to share some beautiful sentences I came accorss.
जीवनाच्या रथाचे वेग तारुण्याच्या सारथ्यानं आपल्या हाती घेतलेले असतात. या रथाला पाच घोडे असतात!
सामर्थ्य
महत्त्वाकांक्षा
निर्भयता
अभिमान
आणि औदार्य !!!
--
बालपण म्हणजे स्फटिकासारखे शुभ्र, धवल रंग! तिथं खोट्या प्रतिष्ठेचे मुखवटे नसतात. तिथं एकमेकांना पाण्यात पाहणारी असूया नसते. भावी आयुष्याचं वाळवंट तुडविताना घायाळ होऊ पाहणार्या जिवासाठी पूर्ण तरतूद म्हणून निसर्गानं केलेला शीतल पाण्याचा तो चषक असतो!!
--
शब्द कितीही समृद्ध असले तरी मनातले सर्वच भाव उतरवताना ते पुरेसे पडतिलच असा काही नाही.
--
माणूस हा कधीच परिपूर्ण नसतो. त्याच्या स्वभावात त्याला नकळत असंख्य दोष लपलेले असतात. बालपणापासून आजूबाजूच्या परिस्थितीचे पडसाद मनावर उमटलेले असतात. ते माणसांच्या स्वभावावर परिणाम केल्याशिवाय रहात नाहीत. क्षणोक्षणी ते प्रकट होत असतात.
--
पाप म्हणजे आत्म्याचा निकृष्ट अविष्कार जेव्हा जेव्हा माणूस आपल्या शरिरातील एका शाश्वत आवाजाशी मनाचा आवाज मिळविण्यास तयार नसतो तेव्हाच विसंवादातून या निकृष्ट अविष्कारची निर्मिती होते तिलाच जग "पाप" म्हणतं.
--
निद्रा ही सर्वात अधिक उदारह्रदयी माता आहे! व्यक्ती- व्यक्तींची विभिन्न दु:ख ती एकाच ममतेनं काही काल का होईना पण निश्चितच आपल्या विशाल उदरात घेते!
--
कुसंस्कारांच्या कर्दमात कमलपुष्पाच्या पाकळ्यांचंही घृणामय शेवाळ होतं! कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे! ते शक्य नसेल तर जास्तीत कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे!
--
धन, संपत्ती, किर्ती, प्रतिष्ठा हे तट कितीही भक्कम असले तरी मृत्युच्या महदिग्विजयी सम्राटापासून ते मानवांचं संरक्षण करूच शकत नाही. त्यासाठी एकच तट कार्यक्षम ठरतो, तो म्हणजे मनाचा!!
--
मन हे किती नाठाळ असतं! जी गोष्ट विसरण्यासाठी माणूस प्राणपणाने प्रयत्न करतो नेमकी तीच गोष्ट मनात एकसारखी घॊटाळत राहते. जीवन हे कधी कधी माणसाची कठोर परिक्षा घेत असावं. कितीही आवडली तरी प्रत्येक गोष्ट माणसाच्या मनाप्रमाणे होईलच असं नाही.
--
अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतिक आहे. जगातील कोणत्याही दु:खाची आग अश्रूंच्या पाण्यानं कधीच विझत नसते. आणि तरिही हे दोन अश्रूबिंदू पाझरल्याशिवाय माझं मन हलकं झालं आहे असं मला कधीच वाटत नाही. कारण या दोन अश्रूबिंदुशिवाय मोठ्या मोलाचं असं मी त्यांना माझ्या आयुष्यात काहीच देऊ शकत नाही आणि यापेक्षा जास्त मौल्यवान असं आपल्या आईबापांच्या प्रेमाची जाणीव म्हणून देता येण्यासारखं काही अस्तित्त्वात असेल असंही मला वाट्त नाही...
--
केवळ जीवंत असणं म्हणजे नव्हे! कसं जिवंत असावं हे किर्ती ठरवीत असते! तसे प्रूथ्वीच्या या विशाल पाठीवर हजारो जीव जन्म घेतात आणि म्रूत्यू पावतात! त्यांच्यासाठी अश्रू ढाळण्याइतका अवसरही कुणाला नसतो! पण ज्यांच्या जाण्यानं मनामनांचे कुंभ वियोगाने विदारक यातनेनं भंग पावतात तेच खरे किर्तीमान! तेच खर्या अर्थाने जगले आणि खर्या अर्थानं मेले!
--
वसंत! वसंत म्हणजे निसर्गदेवतेची मूक्त रंगपंचमी! वसंत म्हणजे सप्तस्वरांचा एकमेकांच्या हातात हात घालून उभा राहीलेल्या खेळगड्यांचा हुतुतूचा संच! वसंत म्हणजे निसर्गदेवतेच्या तलम वस्राचा काळाचा कुंपणात मध्येच अखड्लेला एक सर्वांत देखणा धागा! की वर्षारुतुत खोडकर पावसानं सतत आपल्या सरींच्या असंख्य बोटांनी गुदगुल्या केल्यामुळं हसतेवेळी इकडेतिकडे पाय झटकताना पडलेल्या तिच्या पायातला तो मंजुळ पैंजळ.
If you haven't read this book, you are missing something in life you don't know.